Share

मनपाच्या नागरी मित्र पथकाने केली ७६ लाखांवर वसुली

Published On: 

औरंगाबाद: शासन निर्देशानुसार महापालिकेच्या नागरिक मित्र पथकांकरवी शहरात विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या पथकांनी १ एप्रिल २०२० ते २८जानेवारी २०२१ या कालावधीत विनामास्क वावरणार्‍या १५,३८९ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रूपयेप्रमाणे ७६ लाख ९४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.

पालिका आयुक्‍त पांडेय यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर नित्याने नागरिक मित्र पथकांकडून कारवाई केली जात आहे. यासोबतच रस्त्यांवर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे यासाठी देखील पथकांडून दंड आकारला जात आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात या पथकांनी आजवर विनामास्क वावरणार्‍या १५,३८९ नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रूपयेप्रमाणे ७६ लाख ९४ हजार ५०० दंड रूपयांचा दंड वसूल केला आहे.

प्लास्टिकचा वापर, पाच हजारांचा दंड
शहरातील विविध ठिकाणी फळ,भाजी व इतर किरकोळ विक्रेत्यांकडे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याबद्दल ५००० रुपये दंड वसूल करण्यात आला. विविध ठिकाणी जास्त कचरा आढळून आल्याबद्दल १४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याप्रमाणे दिवसभरात एकूण 29,३०० रुपयांचा दंड वसूल केल्याचे पालिकेने कळवले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!