औरंगाबाद : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राला लागूनच असलेल्या जागेवरील जुने बांधकाम पाडून येथे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्यालय बांधले जात होते. सदर जागा वक्फ बोर्डाची असून ती देवस्थानच्या नावे देण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवरील स्मार्ट सिटी मुख्यालयाचे काम त्वरीत थांबवण्याची सूचना काही दिवसांपूर्वी वक्फ बोर्डाने पालिका आयुक्तांना केली होती.
शनिवारी (दि.30) खा.इम्तियाझ जलील यांनी देखील जालना रोड वरील वक्फ बोर्डच्या जागेत अनेक दुकाने बांधण्यात आले असून शहरातील बड्या धनाढ्य यांना या जागा दिल्याचा आरोप केला आहे. औरंगाबाद पालिका स्वतःच इतरांच्या जागेवर अतिक्रमणे करत असून शहरातील सामान्य नागरिकांवरच अन्याय का? असे आरोप समाजवादी पक्षाने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहेत. त्यामुळे आता पालिका-वक्फ बोर्डाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राला लागूनच असलेल्या सिटी सर्व्हे नंबर २१० मधील जागेवर मुख्य कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीपासून ही जागा पालिकेच्या ताब्यात असून त्याचा वापर आता स्मार्ट सिटीच्या कार्यालयासाठी करण्याचे ठरवण्यात आले होते. येथे स्मार्ट सिटीच्या एमएसआय प्रकल्पाअंतर्गत उभारल्या जाणार्या सीसीटीव्हींच्या दोन कमांड सेंटरपैकी एक सेंटर देखील उभारले जाणार आहे. मात्र आता ही जागा वादात सापडली आहे. आता यावरुनच समाजवादी पक्षाने महापालिकेचे कान टोचले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- प्रिंट मेकिंग चित्रांचे प्रदर्शन आणि परीसंवाद वेबिनार
- कचर्याचे ढिगारे संपवण्यासाठी दोन्ही कचरा प्रकल्प १६ तास चालणार
- एस.टी.बसच्या धडकेत दिव्यांग प्रवासी जखमी
- केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम, मोदींचा पुनुरुच्चार
- मनपाच्या नागरी मित्र पथकाने केली ७६ लाखांवर वसुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

