Share

एस.टी.बसच्या धडकेत दिव्यांग प्रवासी जखमी

Published On: 

औरंगाबाद : मुख्य रस्त्यावरुन वळण घेऊन सिडको बसस्थानकात भरधाव वेगात आलेल्या बसने दिलेल्या धडकेत एक दिव्यांग प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकात घडली. निखील चव्हाण (वय १६, रा.रांजणगाव-शेणपुंजी, ता.गंगापूर) असे एस.टी.बसच्या धडकेत जखमी झालेल्या दिव्यांग प्रवाशाचे नाव आहे.

निखील चव्हाण हा रांजणगावहून सिडकोत राहणाऱ्या मामाच्या घरी आला होता. तिथून तो पून्हा रांजणगावला जाण्यासाठी सिडको बसस्थानकावर आल्यानंतर शहर बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी पुणे येथून जालन्याकडे जात असलेल्या एस.टी.बस क्रमांक (एमएच-०९-एफएल-००७५) ने निखील चव्हाण याला धडक दिली.

या घटनेत निखील चव्हाण याला जबर मार लागला असून निखीलचे मामा नवनाथ गिरी यांनी त्याला उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर बसचालकाने घटनास्थळावरून धुम ठोकली होती. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!