नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून आज आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एक व्हर्च्यअल रॅली घेणार असून त्यासाठी बिहारच्या सर्व जिल्ह्यात मिळून तब्बल 72 हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. या रॅलीपासून राजकारणातील व्हर्च्युअल सभांचा नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात पोस्टरबाजी
जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री व जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार हे राज्यात आघाडीचे सर्वोच्च कमांडर आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. या बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री सुशील मोदी म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी वारंवार हे सांगितले आहे की, नितीश कुमार हे ‘एनडीए’चे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. युद्धाच्या मध्यात कमांडर बदलला जाऊ शकत नाही. नितीश कुमार १५-२० वर्षांपासून एनडीएचे कमांडर आहेत.
जनमताचा अनादर करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – कॉंग्रेस
लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय प्रमुख चिराग पासवान यांनी शनिवारी भाजपाला ट्विटद्वारे, बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? असे विचारले होते. त्यावर उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बिहार निवडणुकीत एनडीएचा चेहरा किंवा नेतृत्व कोण करेल, हा निर्णय आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला घ्यायचा आहे. बिहार व आघाडीच्या हिताच्या दृष्टिने भाजपा जो काही निर्णय घेईल, लोक जनशक्ती पार्टी पूर्णपणे त्या निर्णयाचे समर्थन करेल. असं चिराग पासवान यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

