अहमदाबाद : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार त्याचप्रमाणे राज्य सरकार युद्ध पातळीवर मेहनत करताना दिसत आहेत. तिकडे गुजरातमध्ये मात्र काही वेगळेच चित्र आहे. राज्यसभा निवडणूक जवळ आल्याने गुजरातमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
संकष्टी चतुर्थी असली तरीही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार
गुजरातमध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबायला तयार नाही. गेल्या दोन दिवसांत तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता ६५ वर आली आहे.
गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 आमदारांनी राजीनामे दिल्याने कॉंग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. त्यातून त्या पक्षाने शनिवारी आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी रिसॉर्टस् आणि खासगी बंगल्यांमध्ये हलवले. आता आमदारांना थेट निवडणुकीवेळीच विधानसभेत उपस्थित केले जाईल, असे समजते.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार गुलाबसिंग राजपूत म्हणाले की, ज्या लोकांना दगा द्यायचा होता, त्यांनी पक्ष सोडला. ‘राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर येथे चर्चा केली जाईल. कोणताही आमदार पक्ष सोडणार नाही. ज्या लोकांना लोकांचा विश्वासघात करायचा होता, त्यांनीच पक्ष सोडला. जनमताचा अनादर करणाऱ्या आणि पक्ष सोडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही,’ असे राजपूत यांनी माध्यमांना सांगितले.
…म्हणून तुकाराम मुंढेंच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल
गुजरातमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार रिंगणात उतरवल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. आमदारांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचे संख्याबळ 65 पर्यंत खाली आले आहे. तर भाजपचे 103 आमदार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

