पाटणा : कोरोना साथरोगाच्या संकटात बिहारमध्ये या वर्षीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर-वॉर सुरू आहे.
दारुड्यांसाठी खुशखबर, स्पेशल कोरोना टॅक्स हटवला
भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीच्या विरोधात राजदच्या थाळीनाद आंदोलनाने चांगलेच वातावरण पेटले आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत. शहरात लागेल्या पोस्टर्सवर ‘कैदी बजा रहा थाली, जनता बजाओ ताली’ असे लिहिले आहे.
संकष्टी चतुर्थी असली तरीही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार
दरम्यान, भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली काढणार आहेत. भाजप या रॅलीची गेल्या महिनाभरापासून तयारी करत आहे.यात मोदी सरकारच्या २.० मधील एक वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या यशस्वी कामगिरीवर मुख्य रोख असणार आहे, तर बिहारमध्ये विरोधी पक्ष असलेल्या राजदने पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना रॅलीच्या विरोधात रविवारी थाळीनाद करण्याचे आवाहन केले आहे.


