🕒 1 min read
कोल्हापूर : आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला. यामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या जयश्री जाधव या ९६२२६ इतकी मते मिळवत विजय खेचून आणला. भाजपचे सत्यजित कदम यांना ७७४२६ इतकी मते मिळाली आहे. निवडणुकीअगोदर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते.
भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. ही निवडणूक भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
निवडणुकीअगोदर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकून होते. “कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन”, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या याच वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
या चर्चेवर आता पाटलांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले कि, “आमचे नाना कदम लढले, तर तुमच्या तोंडाला फेस आला. मग मी लढलो तर काय होईल? मी असं म्हटलं होतं की आपण स्वतः कोल्हापुरातून जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईन. मी लढलोच नाही ना. नानाच लढले. अक्षरश: फेस आला तुमच्या तोंडाला. इथे तर कमी मतांनी विजय आहे,” अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
