मुंबई: आयपीएल २०२२मध्ये २६वा सामना आज मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने शानदार सुरुवात केली. ज्यात कर्णधार के एल राहुलने शानदार शतक झळकावले आहे. तो १००व्या सामन्यात आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे.
के एल राहुलने (kl rahul) ५७ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने हे शतक ठोकले. राहुलच्या IPL कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना के एल राहुल सोबत सलामीला क्विंटन डी कॉकने चांगली सुरुवात केली. ज्यानंतर एका टोकावर के एल राहुलने कॅप्टन्स इनिंग खेळत रेकॉर्ड रचले आहे.
https://twitter.com/kishanrp7/status/1515296313126301696?s=20&t=RdcdKlYDm15KaW1Ayp7dxg
मागच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर आलेले हे शतक राहुलची अर्थानी स्पेशल ठरले आहे. के एल राहुल मुंबई विरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत आहे. सोबतच मुंबईविरुद्ध त्याचे हे दुसरे शतक ठरले आहे. जोस बटलर नंतर आयपीएलच्या १५व्या हंगामात शतक करणारा तो दुसरा फलंदाज आणि पहिला कर्णधार ठरला आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 MI vs LSG : मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढत राहुलनं ठोकलं ‘विक्रमी’ शतक; लखनऊचं रोहितसेनेला २०० धावांचं आव्हान!
- “एकटे नाना लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर…”; चंद्रकांत पाटील
- IPL 2022: दीपक चहरच्या एक्झिटने ‘चिन्ना थाला’ चेन्नईमध्ये परतणार?
- IPL 2022 : “इशान किशन १५ कोटींच्या लायक नव्हता…”, CSKच्या माजी खेळाडूची मुंबई इंडियन्सवर टीका!
- “चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याची तारीख महाराष्ट्राला सांगावी”- अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

