मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने आयपीएल २०२२च्या लिलावात इशान किशनवर १५ कोटी रुपये खर्च केल्याबद्दल मुंबई इंडियन्सवर टीका केली आहे. या प्रतिभावान सलामीवीराला एवढ्या रकमेत खरेदी करणे योग्य नाही, असे वॉटसन म्हणाला. जोफ्रा आर्चरला एवढ्या मोठ्या रकमेत खरेदी केल्याबद्दलही वॉटसनला मुंबई इंडियन्सला फटकारले.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच सामन्यांमध्ये एकही विजय नोंदवला नाही. मुंबईने इशानसाठी १५.२५ कोटी आणि आर्चरसाठी ८ कोटी खर्च केले आहेत. आर्चर अजूनही दुखापतीतून सावरत आहे. पुढच्या मोसमापासून तो संघात सहभागी होऊ शकेल.
मुंबईने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना कायम ठेवले. वॉटसन म्हणाला, ”मुंबई इंडियन्स टेबलमध्ये तळाशी आहेत. मला यात आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांनी लिलावात आश्चर्यकारक निर्णय घेतला. इशान किशन खूप हुशार खेळाडू आहे, पण तो इतकी रक्कमेच्या लायक खेळाड़ू नाही. आर्चर बराच काळ क्रिकेट खेळलेला नाही. संघाचे काही निर्णय वाईट होते.”
चेन्नई सुपर किंग्जला (CSK) चार पराभव स्वीकारावे लागले, त्यानंतर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २३ धावांनी विजय मिळवून खाते उघडले. आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळलेला वॉटसन म्हणाला, ”सीएसकेची सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यांच्या वेगवान गोलंदाजीत काहीतरी गडबड आहे. गेल्या वर्षी त्याच्याकडे शार्दुल ठाकूर होता. दीपक चहर स्पर्धेबाहे झाला आहे. त्यांनी लिलावात त्याच्यावर खूप खर्च केला, परंतु आता तो स्पर्धेच्या महत्त्वपूर्ण भागासाठी अनुपलब्ध असेल, जे त्यांच्यासाठी नुकसान आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

