Share

Amit Thackeray | “गृहमंत्रिपद मिळाले तर सरकारमध्ये सहभागी होऊ” ; अमित ठाकरेंचे मोठे विधान, चर्चेला उधाण!

Published On: 

अंबरनाथ : राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे राज्य वाऱ्यावर आहे. दरम्यान या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळेल यावर जोरदार चर्चा रंगली आहे. मनसेला देखील मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा सुरु होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या चर्चेला पुर्णविराम दिला होता. मात्र अमित ठाकरे यांच्या विधानामुळे या चर्चेला पुन्हा सुरवात झाली आहे.

गृहमंत्रिपद मिळाले तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, पण ते देत नाहीत ना, असं मिश्किलपणे मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शुक्रवारी ते अंबरनाथला गेले होते. यावेळी त्यांनी हे विधान केले.

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

मंत्रिमंडळाचा विस्तार आता जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत होऊ शकतो. यामागे ठोस कारण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पुढील तीन-चार दिवसांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे. आज (23 जुलै, शनिवार) पनवेलमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक होती.

24 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आणि त्यांच्या समर्थक पक्षांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एका महत्त्वाच्या बैठकीसाठी दिल्लीत बोलावले आहे. 25 जुलै रोजी नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. अशा स्थितीत 25 जुलैलाही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता धूसर आहे.

राज्यातील पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार होते. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने ते पुढे ढकलावे लागले. शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी 30 जूनला झाला. ही शपथ घेऊन 22 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. 18 जुलैनंतर पावसाळी अधिवेशन सुरू करण्यासाठी 25 जुलै ही नवीन तारीख देण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली न गेल्याने आता 25 जुलैलाही अधिवेशन सुरू न होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्र्यांना आपापल्या विभागाचे काम समजून घेण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या खेचण्यामुळे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यास झालेला विलंब आता अपरिवर्तनीय आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!