मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतरही राज्यातील राजकारण थांबले नाही. शिवसेनेतील पदाधिकारी व इतर नेतेही सातत्याने एकनाथ शिंदे गटाकडे वळू लागले. यानंतर राज्यात शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यात एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याचे पर्व सुरू झाले. अशातच आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपृष्ठ सामनाला रोखठोख मुलाखत दिली आहे. शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं असेल. आजच्या सामनामध्ये या मुलाखतीबाबात माहितीही देण्यात आली आहे.
गद्दारांनी केला पाठीवर वार, मग आता वाचाच शिवसेनेच्या ‘धनुष्यबाणा’चा टणत्कार! अशा मजकूरासह सामनाच्या पहिल्याच पानावर मुलाखतीबाबात माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करत या मुलाखतीची माहिती दिली आहे. २६ आणि २७ जुलै रोजी ही मुलाखत आपल्याला पाहता येणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. ‘जोरदार मुलाखत..सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत..’ असेही ट्वीट संजय राऊत यांनी केलेय. त्याशिवाय त्यांनी मुलाखतीचा फोटोही पोस्ट केलाय. संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. २६ जुलै आणि २७ जुलै रोजी मुलाखत पाहाता येणार आहे. दोन टप्प्यात ही मुलाखत असेल, असा अंदाज बांधला जातोय.
जोरदार मुलाखत..
सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे..
महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली
मुलाखत..
सामना..26 आणि 27 जुलै. pic.twitter.com/U9pVYspDxE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2022
एकनाथ शिंदे यांच्यासह इतर काही आमदारांनी शिवसेनेत बंड पुकारल्याने एक प्रकारे राजकीय भूकंप झाला. गेल्या अडीच वर्षापासून मजबूत मानले जाणारे महाविकास आघाडीचे सरकार काही दिवसांतच कोसळले. शिवसेनेतील फक्त आमदारच नाही तर खासदारही शिंदे गटात गेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात जाणे पसंत केले. आता तर शिंदे गटाने थेट शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी कोणाची हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचले आहे. लवकरच याबाबात सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे. त्यामुळे या मुलाखतीत उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Anil bonde | “मुख्यमंत्री महोदय पुढे ‘उप’ लावायचं राहून जातं”; अनिल बोंडेंनीही व्यक्त केल्या भावना
- IND vs WI : निकोलस पुरनचा ‘रॉकेट थ्रो’ अन् शुबमन गिल झाला आऊट, पाहा ‘हा’ VIDEO!
- Dilip Walse Patil | “एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर…” ; माजी गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती
- Chandrakant patil | “मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”; चंद्रकांत पाटलांची कबुली


