मुंबई : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांना घेऊन एक स्वतंत्र गट तयार केला. या गटाने भाजपशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. सगळ्यांना वाटत होत कि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार मात्र ऐन वेळेला ही घोषणा करण्यात आली कि, मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे विराजमान होतील. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. याचं दुःख आजही भाजपच्या नेते मंडळींना होत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असंच वक्तव्य केलं होत. त्यात आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी देखील अशाच पद्धतीचं व्यक्तव्य केलं आहे.
अनिल बोंडे म्हणाले कि, “जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आदर आहे. मी ही त्यांना मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय..असाच करो. पण त्याला आता उप लागलेलं आहे, हे मात्र विसरून जातो. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एककलमी नेतृत्व आहेत. त्यामुळे जनतेच्या मनातली भावना कोणीही काढू शकत नाही”.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
“स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे संभाळलं. मात्र मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केला. आपल्याला या गोष्टीच दुःख झालं. परंतु हे दुःख पचवून सगळे जण हा गाडा चालवण्यासाठी पुढे आलो”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
या सगळ्या व्यक्तव्यांवरून हे स्पष्ट होत आहे कि, भाजपच्या नेते मंडळींच्या मनात फडणवीसांना मुख्यमंत्री पद न मिळाल्याची खदखद अजूनही आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs WI : निकोलस पुरनचा ‘रॉकेट थ्रो’ अन् शुबमन गिल झाला आऊट, पाहा ‘हा’ VIDEO!
- Dilip Walse Patil | “एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर…” ; माजी गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती
- Chandrakant patil | “मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”; चंद्रकांत पाटलांची कबुली
- Sharad Pawar on Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार


