मुंबई : भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याची शानदार सुरुवात केली आहे. त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क मैदानावर शुक्रवारी उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. दोन्ही संघांमध्ये कल पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजवर ३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन सामन्याचा हिरो ठरला. पण त्याचा जोडीदार युवा सलामीवीर शुभमन गिलचेही जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. बऱ्याच काळानंतर वनडे फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या गिलने डावाची सुरुवात केली होती. त्याने ५३ चेंडूत ६४ धावांसह दमदार अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले होते.
वेस्टइंडीज संघाचा कर्णधार निकोलस पुरनने शुबमन गिलला धावबाद केले होते. सामन्यात गिल आणि धवन १८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एकच धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु येथे ते पूर्णपणे अपयशी ठरले. गिलने मिडविकेटच्या दिशेने बॉल खेळून सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ३० यार्डच्या आत क्षेत्ररक्षण करणाऱ्या पूरनने थेट थ्रो मारून गिलला धावबाद केले. शुबमन गिल चांगल्या कामगिरीच्या दिशेने पावले टाकत असतानाच धावा झाल्यामुळे त्याला निराशेने तंबूत परतावे लागले.
Direct hit from @nicholas_47, and @ShubmanGill perishes. Big blow.
Watch the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode ????https://t.co/RCdQk12YsM@windiescricket @BCCI#WIvIND #INDvsWIonFanCode pic.twitter.com/rfZXKlAnAF
— FanCode (@FanCode) July 22, 2022
धावबाद होण्यापुर्वी त्याने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी १७.४ षटकांत ११९ धावांची सुरेख शतकी भागीदारी रचली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिल ६४ धावा करून बाद झाला होता. त्याचवेळी त्याचा सहकारी शिखर धवनने ९७ धावांचे योगदान दिले. या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर गावांची शतक फक्त तीन धावांनी हुकले. भारताच्या दमदार कामगिरीच्या बळावर संघाने सामना तीन धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या :
- T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती
- Chandrakant patil | “मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”; चंद्रकांत पाटलांची कबुली
- Sharad Pawar on Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी दिली होती – शरद पवार
- Chandrakant Khaire | एक रिक्षावाला करोडो रुपये कसे कमावू शकतो – चंद्रकांत खैरे
- N V Ramana : मी सक्रिय राजकारणात सामील होण्यास उत्सुक होतो, पण नियतीने वेगळा निर्णय घेतला – एन. व्ही. रमणा


