🕒 1 min read
सांगली : काँग्रेस-राष्ट्रवादीने नगरपंचायत निवडणुकीत समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपचा पराभव करणे शक्य होतं. पुढच्या काळात अशी त्रुटी रहाणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता होऊ घातलेल्या महानगर पालिका (Municipal Corporation Election) निवडणुकीवर जयंत पाटलांनी यावेळी भाष्य केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपाचा पराभव करणं शक्य होतं. आकडेवारी तेच दाखवत आहे. अशी त्रुटी राहणार नाही पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना काळजी घेईल”. दरम्यान जयंत पाटील यांनी पक्षात लवकरच आणखी काही प्रवेश होणार असल्याचं सांगितलं आहे. ते तर होणारच आहे. पक्षात प्रवेश होण्याचं प्रमाण वाढलेलं दिसेल. राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. प्रत्येक गुरुवारी मुंबईत मोठ्या संख्येने नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, सांगलीत पण काही दिवसात इनकमिंग झालेले दिसेल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना जोरदार धक्का देत तरुणांच्या हाती सत्ता देण्यात आली. गेल्या चार दशकांपासून हाती सत्ता असूनही खुर्चीचा खेळ आता परवडणारा नाही, असाच संदेश कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूर नगरपंचायतीच्या निवडणूक निकालाने दिला. यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री आर.आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांचा राजकीय मंचावर झालेला दणदणीत प्रवेश आणि कडेगावमध्ये राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना बसलेला पराभवाचा धक्का प्रस्थापितांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. असेही जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्त्वाचा; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंचे प्रतिपादन!
- Health Updates: लता मंगेशकर १७ दिवसानंतरही आयसीयूमध्ये, तब्येतीत सुधारणा
- ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका व्हाव्यात, अशी आमची भूमिका-अजित पवार
- संभाजीनगरचा विकास पाहायला लवकरच येणार; संत एकनाथ रंग मंदिर लोकार्पणात मुख्यमंत्र्यांची ग्वाही..!
- बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनसह सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
