मुंबई : प्रसिध्द गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृतीत (health) सुधारणा होत आहे. डॉक्टरांनी लता दीदींच्या तब्येतीचे अपडेट्स (Health Updates) चाहत्यांशी सतत शेअर करत असतात. त्यांची तब्येत बिघडली तेव्हापासून सर्वजण त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशा शुभेच्छा देत प्रार्थना करत आहेत.
दरम्यान ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोना झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बॉलिवूड गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्या देशाची शान असून देशभरातील लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत. लता मंगेशकर यांची तब्येत बिघडली तेव्हापासून सर्वजण त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशा शुभेच्छा देत आहेत. ८ जानेवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबाकडून नवे वक्तव्य आले आहे.
अलिकडे एक निवेदन जारी करताना, लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, लताजींच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे, मात्र लतादीदीं अजूनही आयसीयूमध्ये (ICU) आहेत. डॉ.प्रतुत समदानी यांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीचे दैनंदिन अपडेट्स देणे शक्य नाही. ही पूर्णपणे कौटुंबिक गोपनीयतेची बाब आहे. आपण सर्वांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. अफवा पसरवणे टाळा आणि लताजींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. असं त्यात नमूद करण्यात आले आहे.
प्रसिध्द गायिका लता मंगेशकर लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातील लोक प्रार्थना करत आहेत. अनुपम खेर, किरण खेर आणि स्मृती इराणी यांनी लताजींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांना दाखल होऊन १७ दिवस झाले असून आता त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. लतादींदीच्या तब्येतीवर डॉक्टर म्हणाले- ‘लताजी निरीक्षणाखाली आहेत’ गायिका तिच्या चाहत्यांना खूप आवडते आणि प्रत्येक लहान-मोठ्या प्रसंगात ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडली जाते. या गायकाने ७० वर्षे बॉलिवूड इंडस्ट्रीत काम केले आहे आणि आपल्या गायनाने सर्वांना प्रभावित केले असून सर्वांच्या लाडक्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर फौजी पित्याने कोर्टाबाहेर घातल्या गोळ्या; वाचा संपूर्ण घटनाक्रम
- सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार; शरद पवार म्हणाले, “माझा बॅचमेट…”
- “अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली”; सोमय्यांना नोटीस पाठवल्यामुळे फडणवीस संतापले
- “माफियाराजवर बोलत असाल तर…”; धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान
- कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!


