औरंगाबाद :औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिलेले आहे. संत एकनाथ रंग मंदिराच्या नूतनीकरण आणि लोकार्पणामुळे औरंगाबादच्या सांस्कृतिक विकासामध्ये अधिक भर पडण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) म्हणाले. संत एकनाथ रंग मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ठाकरे बोलत होते. सिनेमागृहे, उद्याने, नाट्यगृहे यांची जीवनात आवश्यकता असतेच. शहरातील संत एकनाथ रंग मंदिरातून संत एकनाथ महाराजांनी दिलेला संदेश कलेच्या माध्यमातून सर्वदूर पोहचण्यासाठी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. आपण लवकरच संभाजीनगर मध्ये येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरासाठी महत्त्वाचे असलेले गुंठेवारी, नवीन पाणीपुरवठा योजना, पैठण येथे संतपीठ आदीप्रकारचे निर्णय शासनाने घेतलेले आहेत. त्याचबरोबर पैठण येथे सुंदर अशा प्रकारचे उद्यानही शासन करत आहे. विधान मंडळाने औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठविलेला आहे. केंद्र शासनही त्यास मान्यता देईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय, संत एकनाथ रंग मंदिर ज्याप्रमाणे सर्व सोयींयुक्त जनतेच्या सेवेत देण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे संत तुकाराम नाट्यगृहाचेही नूतनीकरणाचे काम लवकरच करण्यात येऊन त्याचेही लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला देसाई यांच्याहस्ते फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून संत एकनाथ रंग मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडेय यांनी केले. यामध्ये त्यांनी शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रम कोविडच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. या लोकार्पण कार्यक्रमास पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
‘ख्रिस गेलने’ने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल म्हणाला…
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमावर फौजी पित्याने कोर्टाबाहेर घातल्या गोळ्या; वाचा संपूर्ण घटनाक्रम
एकाच दिवसात गोल्डनबॉय नीरज चोप्राला दोन पुरस्कार; भावनिक होत म्हणाला…
“मोठ्या माणसांशी मोठ्या माणसांनीच बोलावं, मी फार छोटा माणूस…”, अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
मुंबईत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी; केले शासकिय ध्वजारोहण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

