Share

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनसह सेलिब्रिटींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Published On: 

मुंबई : देशभरात प्रजासत्ताक दिन ((73 Republic Day) मोठया उत्साहाने साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन ही केलं जातं. सोशल मीडियाच्या माध्यमाने देखील शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. त्याचप्रमाणे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक खास फोटो शेअर केले असून चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (Happy Republic) दिल्या आहेत.

संपूर्ण देशात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचं वातावरण आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमाने बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी असून या गर्दीतील एका व्यक्तीच्या हातात भारताचा झेंडा आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा’, असं म्हटलं आहे. असाच आणखी एक फोटो त्यांनी ट्विटरवरही शेअर केला आहे.

 

सेलिब्रिटींनी दिल्या पोस्टद्वारे शुभेच्छा

सर्वत्र साजरा करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सेलिब्रिटींनी आपआपल्या परीने पोस्टद्वारे शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारे बॉलिवूड कालाकारांनी सर्वांचे लक्ष वेधत आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने (Kamgana Ranaut ) इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘आपले पहिले राष्ट्रगीत… सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ‘असं कॅप्शन दिलं आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Tapsi Pannu)देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

तिच्या पोस्टवर देखील चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केली आहे. त्याच प्रमाणे आपल्या अभिनयाच्या जादूने तरूणांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) देखील सुंदर ड्रेस परिधान करुन हातात झेंडा घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे. हे पाहून चाहते मात्र घायाळ झाले असून शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.

बॉलिवूडसह टेलिव्हिजन, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) यानेदेखील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सेलिब्रिटी ते सर्वसामान्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त करतांना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!