Share

लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी युवकांचा पुढाकार महत्त्वाचा; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंचे प्रतिपादन!

Published On: 

औरंगाबाद: लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी युवकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक चळवळ तरूणांमुळे यशस्वी झालेली आहे. देशातील तरूणाईंची संख्या लक्षात घेता लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले(Dr. Pramod Yeole) यांनी केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. येवले बोलत होते.

कार्यक्रमास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मयी सुमीत, अभिनेता मकरंद अनासपुरे, प्र.कुलगुरू प्रा. डॉ.श्याम शिरसाट, सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थ‍िती होती. डॉ. येवले यांनी देशाची प्रत्येक अडचण सोडविण्याची ताकद भारतीय संविधानात आहे. या संविधानाचा तरूणाईने बारकाईने अभ्यास करावा. या हेतूने विद्यापीठात ‘भारतीय संविधान’, ‘राजकारणातील प्रवेश’ विषय पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

सुदृढ लोकशाहीसाठी तरूणाईने राजकारण, भारतीय संविधान, निवडणूक प्रक्रियांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरूणाईमध्ये लोकशाही मुल्ये रूजावीत, त्यांची जागृती व्हावी यासाठी विविध माध्यमातून विद्यापीठ कार्य करत असल्याचे डॉ. येवले म्हणाले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या अभिनव कामकाज पद्धतीचे कौतुक केले. त्यासह सर्वच मतदारांची छायाचित्रांसह असलेली औरंगाबाद जिल्ह्याची मतदार यादी अद्यावत अशी आहे. शिवाय सातत्याने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रिया कामकाज पार पाडण्यात येते. असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!