मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आता यावरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्र्तिक्रिया दिली आहे.
देशभर एमआयएमने भाजप विरोधी भूमिका दाखवली तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील. लोकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. जलील यांनी पॉझिटिव्ह अप्रोच घेतला आहे. तो त्यांनी कृतीत आणावा. समाजाचा विश्वास बसला पाहिजे. त्यांनी कृती करताना समविचारी पक्षासोबत बसायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी सुसंगत निर्णय घेतला पाहिजे. असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान इम्तियाज जलील यांनी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे आघाडीचा प्रस्ताव दिला यावर जयंत पाटील म्हणाले की, ” इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचे निधन झाले म्हणून राजेश टोपे गेले असतील. अशावेळी राजकीय चर्चा करायची नसते. टोपे यांनी ती केली नसेल याची खात्री आहे. या चर्चेबाबत काही विधान करण्याची गरज नाही. निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं ही आमची संस्कृती नाही.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

