मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा १८ वा सामना न्यूझीलँडमध्ये कांगारू संघाविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने ६८ धावा करत आणखी एक विश्वविक्रम केला आहे.मितालीच्या वनडे कारकिर्दीतील हे ६३ वे अर्धशतक आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिने न्यूझीलँडच्या माजी खेळाडू डेबी हॉकलीची बरोबरी केली आहे.
मिताली राजने (mitali raj) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले. मितालीचे वनडे कारकिर्दीतील हे ६३ वे अर्धशतक आहे. न्यूझीलँडची माजी खेळाडू डेबी हॉकलीची (debbie hockley) बरोबरी तिने केली आहे. या दोन खेळाडूंच्या नावावर आता विश्वचषकात १२ वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आहे. मितालीने ७७ चेंडूत अर्धशतक झळकावले.
मितालीच्या खेळीला यस्तिका भाटियाने कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक करत साथ दिली. तिसर्या विकेटसाठी या जोडीने आपापसात १३० धावांची भागीदारी केली, जी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या वनडेमध्ये त्या विकेटसाठी भारतीयांसाठी सर्वाधिक ठरली आहे. फलंदाजीत चांगली कामगिरी करूनही भारतीय संघाणे सामना गमावला.
महत्वाच्या बातम्या
- “शरद पवार पावसात भिजले अन् निमोनिया…”, राष्ट्रवादीचा टोला
- भगवंत मान यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पडला पार!
- “सत्तेच्या खुर्चीसाठी किती तिलांजली”, मविआ सरकारवर केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- “…महाराष्ट्रातही आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा”- आचार्य तुषार भोसले
- “चित्रपटावरच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार घालायला हवा..” ‘बच्चन पांडे’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

