Share

भगवंत मान यांच्या नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पडला पार!

Published On: 

चंदीगढ : काही दिवसांपूर्वीच भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आज पंजाबची राजधानी चंदीगढमध्ये पार पडला. आज याठिकाणी आपच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या दहा आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ –

मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये आम आदमी पार्टीचे नेते हरपाल सिंह चीमा हे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आज हरपाल सिंह चीमा यांच्यासह बलजीत कौर, हरभजन सिंह ईतो, विजय सिंघला, लाल सिंह कटरौचक, गुरमीत सिंह मीत हायर, कुलदीप सिंह धालीवाल, लालजीत सिंह भुल्लर, ब्रह्म शंकर आणि हरज्योत सिंह बैंस या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या उमेदवारांची यादी ट्विटरवरून शेअर केली. यासह “पंजाबचे नवे मंत्रिमंडळ” असे कॅप्शन देखील यादीत दिले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी बोलताना मान म्हणाले होते, “आम आदमी पार्टीचे हे सरकार सदैव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहील, पंजाबमध्ये विकासाचे एक नवे व्हिजन घेऊन आप कार्य करेल”. यानुसार आज भगवंत मान यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!