मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘आता एमआयएमसोबत शिवसेना बसणार. सत्तेच्या खुर्ची साठी किती तिलांजली. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसचा एकच नारा विकासाच नाव नको, राज्याच भल नको, भाजपला रोखूया सत्तेची फळ चाखूया’, असे उपाध्ये म्हणाले आहेत.
आता MIM सोबत शिवसेना बसणार. सत्तेच्या खुर्ची साठी किती तिलांजली.
राष्ट्रवादी, शिवसेना व कॅाग्रेसचा एकच नारा –विकासाच नाव नको
राज्याच भल नको
भाजपाला रोखूया
सत्तेची फळ चाखूया pic.twitter.com/IJo4RfoHjQ— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 19, 2022
दरम्यान, या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना ते म्हणाले की,‘शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारांचे आहेत. जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नाही.’ तसेच एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपला रोखण्यासाठी उद्या पाकिस्तानमधील…”,भातखळकरांचा शिवसेनेला टोला
- जगात कोरोना वाढतोय! केंद्राचे राज्यांना पत्र, राजेश टोपे म्हणाले…
- “एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी नवाब मलिकांचा…”,चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
- “चित्रपटावरच नव्हे, तर संपूर्ण बॉलिवूडवर बहिष्कार घालायला हवा..” ‘बच्चन पांडे’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात..
- “…महाराष्ट्रातही आध्यात्मिक शिक्षणाचा समावेश करावा”- आचार्य तुषार भोसले


