मुंबई: गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्गीता, संतसाहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा. भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी संत साहित्यचे शिक्षण द्यावं, अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी राजकारण करु नये, असेही भोसले म्हणाले.
गुजरातच्या शाळांमध्ये ६ वी ते १२ वीच्या अभ्यासक्रमांत भगवद्गीता सार समाविष्ट केला जाणार आहे. गुजरात सरकारने जारी केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात याची घोषणा केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यातील सर्व शाळांत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून ६वी ते १२ वी इयत्तेतील विध्यार्थ्यांना भगवद्गीतेचे सिद्धांत आणि मूल्य शिकवले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
या पाठोपाठच आता कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेश देखील म्हणाले की, आम्ही आमच्या शाळांमध्ये नैतिक शास्त्राचा अभ्यास केला होता. काही कारणास्तव, तो वर्षानुवर्षे बंद झाला आहे. परंतु अनेक पालकांना वाटते की त्याचा अभ्यासक्रमात पुन्हा समावेश करावा आणि नैतिक शास्त्र हे शालेय स्तरापासून मुलांना शिकवले जावे. याबाबत सध्या आपण फारसा विचार केलेला नसून भविष्यात आपण याची सुरुवात करू शकतो, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:


