Share

‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’

Published On: 

बीड : ५ जून रोजी शिवसंग्राम पार्टीचे आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव सामील झाले होते. यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यात विनायक मेटे यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर मेटे यांनी प्रतिक्रिया देत महविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर मोर्चा काढला म्हणून माझ्यासह हजारो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हरकत नाही, आम्ही त्याला तोंड देऊ पळ काढणार नाही असे मेटे म्हणाले. ठाकरे सरकार मराठा समाजाच्या बाबती दुजाभाव करत आहे. मोर्चा काढणार असे जाहीर केल्यापासूनच जिल्हा प्रशासनाकडून आडकाठी आणण्याचे प्रयत्न झाले.

हे सरकार जर खरंच न्यायाने वागत असेल तर मुंबईत मुख्यमंत्री, मंत्री व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमावर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मेटे यांनी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्री व वरिष्ठ अधिकारी जमले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह या सर्वांवर देखील गुन्हा दाखल करावा, तरच हे सरकार न्यायाने वागते असे म्हणता येईल, असे मेटे म्हणाले.

दरम्यान, मुंबई मेट्रोच्या चाचणीवरुन भाजपनेही ठाकरे सरकारवर टीका केली होती. कोरोना संकटकाळात जाहिरातबाजीतून जनतेच्या पैशाचा चुराडा कशासाठी?, असा सवाल भाजपनं केला आहे. मेट्रो प्रकल्पाची बर्बादी करणारे मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने उद्घाटनाची चमकोगिरी करतायत? हा प्रकल्प रखडवल्याबद्दल त्यांनी मुंबईकरांची माफी मागायला हवी. परंतु कोरोनाच्या काळात न केलेल्या कामाची ते जाहिरातबाजी करतायत, अशी टीका भाजपनं केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!