🕒 1 min read
मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रविवारी कडाडून टीका केली आहे. ‘काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो’, असे अजित पवार यांनी म्हटले.
यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2021
‘अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. निलेश राणेंच्या टिकेला अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसे उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ट्विटरच्या जिवावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?’ शिवसेनेचा मोदींना सवाल
- ‘सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेवर भर
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
