मुंबई : तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील कोरोना निर्बंध आजपासून शिथील होणार आहेत. आज सकाळपासून मुंबई, पुणे आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अनलॉकिंगच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. त्यात मुंबई तिसऱ्या गटात काही अंशी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. यावरुन काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
संजय निरुपम यांनी एक ट्विट करत ठाकरे सरकारला प्रश्न विचारलाआहे. ‘मुंबईत लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, यामुळं लोकांना त्रास जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूक नाहीच. एकतर बसेची संख्या वाढवा किंवा काही प्रमाणात लोकल सुरु करण्यात यावी. लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसला एक मर्यादा आहे,’ असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
मुंबई में #लॉकडाउन की कुछ पाबंदियाँ हटाई गई हैं पर उससे लोगों को और कष्ट होगा।
ऑफिस खुल रहे हैं पर पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं।
या तो बसों की संख्या बढ़ाई जाए या ट्रेनें सीमित तरीके से शुरु की जाए।
वरना लोग ऑफिस जाएँगे कैसे ?
वर्क फ्रॉम आफिस की एक मर्यादा है।#Unlock #Maharashtra— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) June 7, 2021
दरम्यान, मुंबईतील निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे दादर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. आज सकाळपासूनच लोकांनी कामासाठी घराबाहेर पडायला सुरवात केली आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या ट्रॅफिकवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनलॉक मुळे आता आंतरजिल्हा बंदी असली तरी ई-पास गरजेचा आहे. सध्या मुंबईला जाण्यासाठी मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
- ‘ट्विटरच्या जिवावर निवडणुका जिंकल्या, मग आता भाजपचा विरोध का?’ शिवसेनेचा मोदींना सवाल
- ‘सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेवर भर


