Share

मोठी बातमी! पंतप्रधान मोदी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार

Published On: 

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट कमी होत आहे. आज लाखावर नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे आजपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे.

यामध्ये देशातील करोनाची स्थिती, म्युकरमायोकोसिसचा धोका, देशभरातील लसीकरण मोहीम, शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर मोदी बोलू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. तसेच, आता देशातील अनेक मोठी शहरं अनलॉक होत असल्याने, या पार्श्वभूमीवर जनतेला दक्षता बाळगण्या संदर्भातही मोदी बोलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, देशभरातील ५ राज्यांच्या झालेल्या निवडणुकांनंतर नुकतीच प्रथमच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीमध्ये सर्व महासचिव उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान मोदी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी पराभवातूनही शिकायला हवे, असा सल्ला मोदींनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!