Share

‘नावे ठेवणारे आता आमचेच अनुकरण करत आहेत’, विनायक मेटेंचा छत्रपती संभाजीराजेंना टोला

Published On: 

बीड : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी आयोजकांसह ३ हजार लोकांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यात आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोर्चाला मराठा समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तर त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे काल, दि. ६ जून रोजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

यावरून शिवंसग्रामचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी संभाजीराजे यांचे नाव न घेता टीका केली आहे. ‘कोण काय म्हणतंय, याला आम्ही फार महत्व देत नाही. ज्यांनी आमच्यावर समाजाची दिशाभूल करतायेत असा आरोप केला, तेच आता आमचे अनुकरण करत आहेत. आम्ही जे निर्णय घेतले त्याच्या पाठीमागे येत आहेत. आधी मोर्चाला विरोध केला आणि आता तेच मोर्चाची तारीख जाहीर करत आहेत’, अशा शब्दात मेटे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना नाव न घेता टोला लगावला.

‘मराठा समाजाला न्याय, सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत राहू. ज्यांनी आमच्यावर हे समाजाची दिशाभूल करत आहेत, विश्वासघात करत आहेत. आधी मोर्चाला विरोध केला, आणि आता तेच मोर्चाची तारीख जाहीर करत आहेत, मग आता समजाची दिशाभूल नाही का? आता लोकांची, समाजाची दिशाभूल कोण करतयं हे जनता ठरवेल’ असे मेटे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!