Share

“आता संयम संपला…”; संजय राऊतांचा भाजपला इशारा!

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर सतत हल्लाबोल करत असताना पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा राऊतांनी भाजपला केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींवरून इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहेत यावर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले, “केंद्रीय तपास यंत्रणा कायद्याचा आणि अधिकाराचा गैरवापर करत आहेत. ज्या कारवाया होत आहेत त्या बेईमान आणि बेकायदेशीर कारवाया आहेत. पण ही केस किती खोट्या पायावर उभी आहे, ते तुम्हाला कळेल, असे राऊत म्हणाले.

अनिल देशमुख यांच्या ६ वर्षांच्या नातीची चौकशी करावी, एवढ नीच राजकारण सध्या सुरु आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

तसेच संजय राऊत भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत बोलताना म्हणाले, “१३ , १४ वर्षापूर्वी विक्रांतच्या नावाखाली पैसे दिले. त्यांना वाटतं आमचे पैसे योग्य ठिकाणी गेले. पण राजभवन आमचं नाही. त्यांचं आहे त्यांनी पैसे न मिळाल्याची माहिती दिली. तुम्ही महात्मा गांधी आहात का? दादासाहेब धर्माधिकारी आहात का? विनोबाजी भावे आहात का? तर तुम्ही भ्रष्ट आहात. वेगळ्या कारणावरून पैसे गोळा केले आणि पक्षाला दिले. पावती कुठेय फक्त ११ हजार म्हणत आहेत पण माझा ५८ कोटी रुपयांचा आरोप बरोबर आहे”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!