मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022 ) स्पर्धेला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा (KKR) वेगवान गोलंदाज रसिख सलाम (rasikh salam) स्पर्धेबाहेर पडला आहे. रसिख सलामच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे रसिख लीगमधून बाहेर पडला.
कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) वेगवान गोलंदाज हर्षित राणाला करारबद्ध केले आहे, असे आयपीएलने सांगितले. रसिख या हंगामात केकेआरसाठी दोन सामने खेळले. त्याच्या जागी खेळण्यासाठी केकेआरमध्ये सामील होणारा राणा दिल्लीकर आहे. त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघाचा भाग बनवण्यात आले आहे. केकेआरसाठी आतापर्यंतचा आयपीएल हंगाम चांगला राहिला आहे.
Goodbyes are never easy but we're sure you will be back stronger! ????
Wishing you a speedy recovery, @rasikhsalam04 ????#KnightsInAction presented by @glancescreen | #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/gVoqByI5tO
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 17, 2022
आयपीएलच्या या मोसमात केकेआरने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला हरवून धमाकेदार सुरुवात केली. यानंतर त्यांनी आणखी काही सामन्यांमध्ये विजय मिळवला. केकेआर आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांत ३ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे ६ गुण आहेत. त्यांचा नेट रनरेटही चांगला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू दीपक चहर या स्पर्धेतून बाहेर पडला होता. चहरला पाठीच्या दुखापतीमुळे त्रास झाला होता आणि तो या मोसमात एकही सामना खेळला नाही.
???? UPDATE: Harshit Rana replaces an injured Rasikh Salam in the KKR squad.
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 15, 2022
दीपक चहरचा आयपीएलच्या वार्षिक करार यादीत समावेश आहे. त्याला ग्रेड-सीमध्ये स्थान देण्यात आले आहे. यानुसार त्याला दरवर्षी एक कोटी रुपये मिळतात. दुखापतीमुळे टी-२० लीगमध्ये एकही सामना न खेळल्याने त्याला पूर्ण १४ कोटी रुपये मिळतील. बीसीसीआयने (BCCI) २०११ मध्ये करार मिळालेल्या खेळाडूंसाठी विमा पॉलिसी लागू केली होती. याचा लाभ चहरला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

