Share

भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता!

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी आक्रमक झालेली आहे. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाही तर त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीस लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला. यावरूनच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या मुस्लिम संघटनेने ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नही.’ असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार राज ठाकरेंना सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे.

पीएफआयने काय दिला होता इशारा ?

काही लोक वातावरण बिघडवण्याचा काम करत आहेत. काही लोकांना अजानची अडचण होत आहे. काही लोकांना भोंग्यांची अडचण होत आहे. काही लोकांना आपल्या मस्जिद, मदरश्यांचा त्रास होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा नारा आहे की ‘हर मजदूर हमारा है’ सोबतच आमचा दुसरा नारा आहे, ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नही’. एवढं लक्षात ठेवा. एक मदरसा, एक मस्जिद, एकाही लाऊडस्पिकरला हात लावण्याचा प्रयत्न केलात तर सर्वात पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया दिसेल. अशा शब्दात पीएफआयचे नेते मतीन शेखानी यांनी इशारा दिलाय.

सोशिअल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अझहर तांबोली यांनी यावेळी मशिदीच्या भोंग्यांवरून होणाऱ्या राजकारणावर टीका केली. मशिदीच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हिंदू ओवेसींना रोखण्यासाठी प्रयत्न करा, असेही यावेळी ते म्हणाले. त्याचबरोबर आम्ही मुस्लिम समाजाच्या सोबत आहोत, मुस्लिम समाजाला व्हिक्टिम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरेंकडून जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर ते हिंदू ओवेसी आहेत तर त्यांना दाबून ठेवा. सगळे निर्बंध मुस्लिम समाजावर का ? आम्ही घटनात्मक मार्गाने उत्तर देणार. पण अंगावर आलात तर सोडणार नाही. असा इशारा अझहर तांबोळी यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!