Share

IPL 2022 : सलग सहा पराभव..! मुंबई इंडियन्सची वाईट अवस्था पाहून मलिंगा म्हणतो, “हा संघ नेहमीच…”

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अजून विजयाचे खाते उघडता आलेले नाही. या लीगमध्ये मुंबई संघ अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. पाच वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा चालू मोसमात सलग सहावा पराभव झाला. या संघाबाबत मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज आणि सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा याने (Lasith Malinga) आपले मत दिले आहे.

खराब फॉर्म असूनही मुंबई इंडियन्सला मलिंगाची साथ लाभली आहे. ”मुंबई इंडियन्स नेहमीच पुनरागमन करणारा संघ राहिला आहे. यावर्षी ते प्लेऑफमध्ये पोहोचतील किंवा नसतील तरी, त्यांच्याकडून मोसमाचा शेवट मजबूत होण्याची अपेक्षा आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्यांच्या प्रमुख खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये निश्चितच गुणवत्ता आहे.”

शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपरजायंट्सकडून १८ धावांनी पराभव झाला. गुणांचे खाते उघडण्यात अयशस्वी ठरलेला मुंबई इंडियन्स सध्या पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. कर्णधार केएल राहुलच्या (नाबाद १०३) शतकी खेळीमुळे लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकांत ४ बाद १९९ अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकांत ९ बाद १८१ धावाच करू शकला.

मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या एका हंगामात सलग सहा पराभव स्वीकारणारा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनीही त्यांचे पहिले सलग सहा सामने गमावले होते. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि आरसीबी हे दोन्ही संघ त्या वर्षी पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होते. मुंबई इंडियन्सला आता त्यांचा पुढचा सामना गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुरुवारी खेळायचा आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

महत्त्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!