औरंगाबाद: खैरेनी २५ वर्षे काय केले हे मला सांगायची गरज नाही. धर्माच्या नावावर ते निवडून येत होते. मी विकासाच्या नावावर निवडून येण्यायासाठी प्रयत्न केला. माझा तो प्रयत्ना फसला. खैरेंनी आयुष्यभर काहीही केले नाही. फक्त हिंदूंचे नाव घेऊन जन्मभर खासदार राहण्याची त्यांची इच्छा होती. दंगली घडवायच्या, वादावादी करायची हेच त्यांनी केले. इम्जतियाज जलील(Imtiyaj Jaleel) उभे राहिले नसते तर मी २०० टक्के सांगतो मी निवडून आलो असतो. खैरेला २ लाख मतांनी पाडला असता. आणि हे कोणी नाकारू शकत नाही. माजी आमदार हर्षवर्धन जाधव(Harshawardhan Jadhav) बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले, मृतदेह पाहून मी माझ्या पदाचा त्याग केला. नगरसेवक होण्यासाठी लोक वाट्टेल ते करतात. मी आमदार होतो मात्र मी माझ्या पदाचा त्याग केला. चंद्रकांत खैरे हे कायम हिंदुत्वावरून राजकारण करत राहीले. धर्माच्या नावावर ते इतकी वर्षे निवडूनही आले. ही त्यांची प्रथा मी मोडण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या नावावर निवडणूक लढवण्याचा मी प्रयत्न केला, मात्र तो फसला. खासदार इम्तियाज जलील यांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरला होता. राजकारणाला वळण लागावे, हिंदू मुस्लमान व्हावे, खैरेंनी निवडून यावे यासाठी हा डाव तर नव्हता ना? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तसेच यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले धर्माला पाहून तुम्ही निवडून देता का? जर तुम्ही असे करत असाल तर गरिबांना धर्म परवडत नाही. महाराष्ट्रात एखादा गरीब माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधत असेल तर त्याच्या विरोधात पोलीस पाठवले जातात. खरा धर्म हा नाही. आणि खरा धर्म काय आहे हे सामान्य जनतेला कळायला हवे. आपण आपल्या उभ्या आयुष्यात धर्मावरून कधीही राजकारण केले नाही. हिंदू मुसलमान भेद केला नाही. कन्नड या आपल्या मतदार संघात जाऊन कोणालाही विचारून पाहा असे खुले आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या:
- महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर घसरला.
- राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्राला सर्वाधिक मते; निकाल मात्र प्रलंबित
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार
- “मराठी भाषेचा कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर..”, भाजपची महाविकास आघाडीवर टीका
- कितीही दबाव निर्माण केला तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही- नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

