नवी दिल्ली: सेंटर फॉर मॉनिटरिंग इकोनॉमिने दिलेल्या अहवालानुसार भारतातील बेरोजगारीचा दर घसरला असून तो ६.५७ टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी दर ४.२ तर हरियाणात सर्वाधिक जास्त २४.४ टक्के आहे. मार्च २०२१ नंतर हा सर्वाधिक घसरलेला दर आहे. कोरोनाच्या २ लाटी आणि नंतर आलेला अमायक्रोन वेरीअंटचा धोका यातून भारत नुकताच सावरत असून ही परिस्थिति दिलासादायक आहे.
महाराष्ट्रात जानेवरी २०२२ मध्ये बेरोजगारी दर ४.२ टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 मध्ये देशातील शहरी भागात बेरोजगारीचा दर हा ८.१६ टक्के इतका आहे तर ग्रामीण भागातील हा दर ५.८४ टक्के इतका आहे. डिसेंबर २०२१ मध्ये देशातील बेरोजगारीचा दर हा ७.९१ टक्के इतका होता. डिसेंबर २०२१ मध्ये बेरोजगारीचा दर हा शहरी भागात ९.३० टक्के आणि ग्रामीण भागात ७.२८ टक्के इतका होता.
बेरोजगारीच्या प्रमाणाचा विचार करता तो तेलंगणा (०.७ टक्के) राज्यात सर्वात कमी आहे तर हरयाणामध्ये (२३.४ ) तो सर्वाधिक आहे. गुजरातमध्ये हा दर १.२ टक्के, मेघालयमध्ये १.५ टक्के ओडिशामध्ये १.८ टक्के तर राजस्थानमध्ये १८.९ टक्के इतका आहे. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण ५३ दशलक्ष इतके बेरोजगार लोक होते आणि त्यापैकी महिलांची संख्या ही मोठी होती असं CMIE ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऐनवेळी कसोटी क्रिकेट सामन्याचे ठिकाण बदलले
- औरंगाबादेत हुल्लडबाजी तरुणाला भोवली; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ‘जेलवारी’..!
- स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकासोबत क्रिस गेलचा फोटो व्हायरल
- कितीही दबाव निर्माण केला तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही- नवाब मलिक
- आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यात ‘शिवतेज’ अभियान!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

