Share

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्राला सर्वाधिक मते; निकाल मात्र प्रलंबित

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर दरवर्षी पथसंचलन होते. यातून देशभरातील चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात घडवले जाते. यात पथसंचालनात सहभागी होणाऱ्या चित्ररथांची एक प्रकारे स्पर्धा असते. महाराष्ट्रानेही यावर्षी आपला चित्ररथ सादर केला होता. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आले. यावेळेस राजधानी दिल्लीत राजपथावरील चित्ररथासाठी ऑनलाईन मतदान मागवण्यात आले होते. या मतदानात महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वात जास्त मते पडली आहेत.

इतर वेळी पथसंचलन झाल्यानंतर दुसऱ्याचं दिवशी रात्रीपर्यंत या स्पर्धेचे निकाल जाहीर होत असतात. मात्र अजून या स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राला जास्त मते मिळाल्यामुळेच तर निकाल प्रलंबित केला जात नाही ना?, असा सवाल केला जात आहे. यास्पर्धेत महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक 23 टक्के म्हणजे 22 हजार 649 मते मिळाली आहेत. तर त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला 22 टक्के म्हणजे 21 हजार 585. तीन क्रमांकावर जम्मू-काश्मीरच्या चित्ररथाला 12 हजार 124 म्हणजे १२% मते मिळाली आहेत.

महाराष्ट्र सरकारने यंदा ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर चित्ररथ तयार केला होता. या चित्ररथाची संकल्पना कास पठारावर आधारित होती. यात आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. शिवाय खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू अशा प्रतिकृती बनविण्यात आल्या होत्या. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. सुरुवातीला महाराष्ट्राच्या चित्ररथाला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने काही दिवसांतच आपला हा निर्णय मागे घेत महाराष्ट्राच्या चित्ररथाला राजपथावरील संचलनात सहभागी होण्याची परवानगी दिली होती.

महत्वाची बातमी:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!