Share

“मराठी भाषेचा कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर..”, भाजपची महाविकास आघाडीवर टीका

Published On: 

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यभरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहत असतानाच आता भाजप आमदार पराग शाह (BJP MLA Parag Shah) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“मराठी पाट्यांचे धोरण आखणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी BMC अर्थसंकल्पाचे जास्तीच जास्त ट्विट फक्त इंग्रजीत केले. मराठी भाषेचा कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर मराठी अस्मितेचा खेळ बनवून चिंधड्या उडवायच्या. निवडणुकीसाठी खोटी मराठीची तुतारी वाजवणारी मराठीद्रोही मुंबई महापालिका आणि महाभकास आघाडी आहे”, अशी टीका भाजप आमदार पराग शाह यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या ट्वीटर अकाउंटचाही एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात आज सादर झालेल्या मुंबई अर्थसंकल्पाबाबत इंग्लिशमधून माहिती लिहिण्यात आली आहे. याचाच फोटो पोस्ट करत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!