🕒 1 min read
मुंबई : देशात ईडी, सीबीआय, एनआयए अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचे काम सुरु आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक(Nawab Malik) यांनी केली आहे.
यासंदर्भात नवाब मलिक यांनी आज(३ फेब्रु.)पत्रकार परिषद घेतली असून यावेळी बोलत असतांना मलिक म्हणाले,‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी आदरणीय शरद पवार साहेबांना नोटीस बजावण्यात आली, डीएमके नेत्यांच्या घरी छापेमारी झाली, उत्तर प्रदेशमध्येही हेच सुरु आहे. पण महाराष्ट्र राज्यावर कितीही दवाब टाकला तरीही ते झुकत नाही म्हणून भाजप वेगवेगळे डाव आखत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांवर कारवाईच्या माध्यमातून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु,कितीही दबाव निर्माण केला तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही’, असे मलिक म्हणाले आहेत.
अनिल देशमुखजी असतील किंवा संजय राऊतजी यांच्या निकटवर्तीयांवर जी कारवाई होत आहे. हे सर्व राजकीय दबाव निर्माण करण्याकरीता सुरु आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. कितीही दबाव निर्माण केला तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही. pic.twitter.com/GNGrg3RCdf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 3, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी तीनही पक्षातील कोणताही नेता या दबावाला घाबरणार नाही. देशात सुरु असलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून परिस्थिती समोर येईलच आणि जास्त काळ हा यंत्रणांचा गैरवापर चालणार नाही,’ असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मोदी सरकारच्या विरोधात बोलले कि त्यांचा वेताळ बोलणाऱ्याच्या खांद्यावर बसतो- सचिन सावंत
- राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्राला सर्वाधिक मते; निकाल मात्र प्रलंबित
- तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार
- “मराठी भाषेचा कैवारी असल्याचा टेंभा मिरवायचा नंतर..”, भाजपची महाविकास आघाडीवर टीका
- खिशात देशी दारु आणि दारूच्या नशेत धूत… गोपीचंद पडळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
