नागपूर : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्याकडे सोपवला. आपला नियोजित तेरा महिन्याचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आता महानगरपालिकेचे नवे महापौर राहतील अशी माहिती सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. यापुढे भाजपाचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून काम करत राहू अस त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं. महापौर संदीप जोशी यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे यांनी सुद्धा आपला राजीनामा आयुक्तांकडे सोपवला आहे.
यावेळी त्यांनी आपल्या वर्षभरातील कामाचा लेखाजोगा मांडला. तर, काही कामे राखडल्याची खंत देखील व्यक्त केली. राहिलेले कामे नवनियुक्त महापौर दयानंद तिवारी पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच, सुलभ शौचालयांसाठी जागा शोधली, डिझाईन तयार केले, कार्यादेशही निघाले. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौर निधी खर्चालाही अडवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध; काय आहे नेमकं कारण?
- पश्चिम बंगालमध्येही चालणार पवार पॉवर? ममतादीदींच्या मदतीसाठी शरद पवार जाणार धावून?
- संदीप जोशींच्या राजीमान्यानंतर आता ‘हा’ दिग्गज नेता होणार नागपूरचा महापौर
- संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण
- ‘मोदींच्या विरोधकांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

