🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारच्या जाचक नवीन कृषी कायद्यांविरोधात अजूनही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असं शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केलं. तर, दुसरीकडे विरोधक शेतकऱ्यांना भडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांगल्या कामांना केवळ राजकीय फायद्यासाठी विरोध करत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांचं आंदोलन सुरू आहे. दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडं या आंदोलनावरून राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी एकत्र येऊन काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली होती.
दरम्यान, भाजप नेते अवधूत वाघ यांनी या आंदोलनाला जत्रा असं संबोधलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘नोटाबंदी,GST, NRC, CAA, 370, 35A, सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा,राफेल आदी साऱ्या बाबतीत मोदीजींना प्रखर विरोध करुन परत परत तोंडावर आपटणाऱ्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे’ शी टीका त्यांनी विरोधकांवर ट्विटरद्वारे केली आहे.
नोटाबंदी,GST, NRC, CAA, 370, 35A, सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा,राफेल आदी साऱ्या बाबतीत मोदीजींना प्रखर विरोध करुन परत परत तोंडावर आपटणाऱ्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे
The #FarmersProtests is nothing but political tourism#FarmersWithModi— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) December 21, 2020
महत्वाच्या बातम्या
- कोरोना लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध; काय आहे नेमकं कारण?
- पश्चिम बंगालमध्येही चालणार पवार पॉवर? ममतादीदींच्या मदतीसाठी शरद पवार जाणार धावून?
- Breaking: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरेंनी उचललं महत्वाचं पाऊल
- संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण
- ‘गांधी नाही तर फक्त नरेंद्र मोदीच या देशाचं भविष्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
