Share

पश्चिम बंगालमध्येही चालणार पवार पॉवर? ममतादीदींच्या मदतीसाठी शरद पवार जाणार धावून?

Published On: 

मुंबई : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापवले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे.

त्यामुळेच आता सत्ता कायम ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर कडवं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळेच त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे थेट पश्चिम बंगाल गाठू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेला खुद्द राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी दुजोरा दिला आहे.

ममता बॅनर्जी या पुढील महिन्यात जानेवारीत कोलकातामध्ये भाजपविरोधी मेळाव्याची तयारी करत आहेत. त्यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. माध्यमांच्या वृत्तानुसार, शरद पवारांशी चर्चेदरम्यान ममतांनी त्यांना आमंत्रणही दिले आहे. यावेळी इतर विरोधी पक्षातील नेते देखील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, भाजपने केंद्रातील सत्तेच्या जोरावर पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. हा विषय गंभीर असून यासंदर्भात ममता बॅनर्जी व शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. गरज पडल्यास शरद पवार पश्चिम बंगालमध्येही जातील, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!