Share

कोरोना लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध; काय आहे नेमकं कारण?

Published On: 

जकार्ता : गेल्या वर्ष भरापासून जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घटल असून अनेकांचे या आजाराने बळी गेले आहेत. जवळजवळ सर्वच देशांत कोरोनाने कहर माजवला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. काही दिवसांपासून कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत आहेत. मात्र, आता या लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं आहे.

ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातील राजनैतिक अधिकारी आणि मुस्लिम धर्मगुरु चीनमध्ये गेले होते. राजनैतिक अधिकारी लसीचे डोस मिळविण्यासाठी गेले होते, तर धार्मिक नेते कोरोना प्रतिबंधक लस इस्लामिक कायद्याच्या नियमात बसते का, याची चाचपणी करण्यासाठी गेले होते. लस तयार करताना डुकराच्या मांसापासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान लस सुरक्षित आणि परिणामकारक राहण्यासाठी हे जिलेटिन स्टॅबिलायझरची भूमिका निभावते. मुस्लिम आणि ज्यू धर्मियांमध्ये डुकराचे मांस निषिद्ध असल्याने या जिलेटीनच्या वापरावर काही गटांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे काही देशांमध्ये लसीकरण मोहिमेला अडथळा येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडं, याच धर्मांमधील इतर अनेक तज्ज्ञांनी आणि गटांनी लस वापरण्यास कोणतीही हरकत उपस्थित केलेली नाही. डुकराच्या मांसापासून (पोर्क) तयार केलेल्या जिलेटिनचा लसनिर्मितीमधील वापर हा अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा असून अनेक कंपन्या ‘पोर्क-मुक्त’ लसीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्वित्झर्लंडमधील नोव्हार्तीस कंपनीने मेंदूविकारावर अशी लस विकसीत केली असून सौदी अरेबियाही तसा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा पद्धतीने तयार केलेली लस कमी काळ टिकते. ध्याची मागणी आणि संसर्गाची परिस्थिती पाहता अनेक मुस्लिमबहुल देशांना पोर्क-मुक्त लस मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे परंपरावादी मुस्लिम आणि ज्यू नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. डुकराच्या मांसाचे सेवन निषिद्ध असताना वैद्यकीय कारणांसाठी त्याचा वापर करणे धर्मनियमांमध्ये बसते का, अशी त्यांच्या मनांत शंका आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!