Share

संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण

Published On: 

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात समाजातील महिलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळाला. त्या काळात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. प्रसंगी दगडधोंडे देखील त्यांनी सहन केले. मात्र, समाज परिवर्तनाचा ध्यास त्यांनी सोडला नाही.

त्यांच्या याच संघर्ष जीवनावर मराठी मालिका सुरु करण्यात आली होती. मात्र, प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही मालिका बंद करावी लागली आहे. ‘सावित्री ज्योती’ असं मालिकेचं नाव होतं. सोनी मराठी या वाहिनेवर ही मालिका सुरु करण्यात आली होती. टीआरपी नसल्यामुळे ही मालिका बंद करावी लागली असून निर्माते महेश टिळेकर यांनी प्रेक्षकवर्गाला जबाबदार धरलं आहे.

‘फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?’ असा सवाल टिळेकरांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच, ”नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. तुम्हीच विचार करा की प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असल्याचं समजल्यावर ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार यांच्यासारख्या कलाकारांचा जीव किती तुटत असेल. मालिकेत जीव ओतून काम करूनही टीआरपीच्या स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही, याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड आहे की आणखी काही वेगळं कारण आहे यावर विचार करायला हवा.’ अशा भावना महेश टिळेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

या मालिकेचं बंद होणं खरंच विचारधारेला संपुष्टात आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात आहे. प्रेक्षकवर्गाने वेळीच जागं होऊन अशा मालिकांना प्रतिसाद देणं गरजेचं आहे. कारण मनोरंजनासोबतच वैचारिक पातळी, समाज भावना, बदलांची गरज हे सर्व देखील महत्वाचं असून वैचारिक प्रगल्भता न झाल्यास समाजात त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!