मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या पाश्वर्भूमीवर युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात काल तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली.
यादरम्यान नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीची आहे म्हणून भेदभाव करणारी वागणूक दिली असा आरोप करत त्यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. म्हणाल्या, “मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घऱाबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. आणि मी तेवढंच करणार होते. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या. मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे”.
“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही असं सांगितले. हा सरळसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे, मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असे ते म्हणाले,” असा थेट आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

