🕒 1 min read
बीड : राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २० जून रोजी १० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांकडून चढाओढ सुरु झाल्याचे दिसते. भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक वक्तव्य केले आहे.
“मी विधान परिषदेवर जावं ही माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांवर लढत आहे. आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. अशावेळी विधान परिषदेवर मला पाठवावं, ही माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा. मात्र शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य असेल,” असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चा पुकारला आहे.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ जूनला अधिसूचना जाहीर होईल. उमेदवारांना ९ जूनपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. २० जूनला मतदान पार पडेल. संख्याबळानुसार भाजपचे ४ आमदार निवडून येऊ शकतात. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांच्या नावाची सध्या चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
