Share

धक्कादायक! २१ वर्षीय तरुणीचा Metaverse मध्ये बलात्कार

Published On: 

🕒 1 min read

 

ग्लोबल : बलात्कारासारख्या घटनांच्या बातम्या ऐकून आपण सुन्न होतो. अलीकडील काळात बलात्कार या सारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही आपण ऐकून असतो. बलात्काराच्या घटनांनी अनेकदा समाजाचा रोष पार टोकाला पोहोचल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. आपल्या देशातील दिल्ली बलात्कार प्रकरण असो, मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरण असो किंवा अलीकडील हैद्राबाद बलात्कार असो, या घटनांनी समाजमन ढवळून निघाले होते. या प्रकरणांमध्ये समाजमन पेटून उठले होते. आता मात्र मेटावर्स Metaverse च्या आभासी जगात बलात्कार झाल्याचा आरोप एका मुलीने केला आहे.

आता बलात्काराची एक वेगळी बातमी येत समोर आली आहे. भौतिक जगातील बलात्काराचे अनेक प्रकरणे माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोहचत असतात. भौतिक जग महिलांसाठी सुरक्षित नाही असे अनेकांकडून म्हंटले जाते. परंतु आता भौतिक जगाप्रमाणे आभासी जगही महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. मेटावर्स Metaverse च्या आभासी जगात बलात्कार झाल्याचा आरोप एका मुलीने केला आहे. आपल्यावर बलात्कार होताना तो दुसरा AVATAR पाहत असल्याचा दावाही या तरुणीने केला आहे. हा सर्व प्रकार मेटावर्सच्या माझ्या आभासी (avtar) अवतारासोबत घडत असले तरी ते प्रत्यक्ष माझ्यासोबत घडत असल्याचे असे मला वाटत होते, असे पीडित तरुणीने सांगितले आहे.

यानंतर आता भौतिक जगासोबत आभासी जग सुद्धा महिलांसाठी सुरक्षित नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!