टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. याच दृष्टीने सत्ता राखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. याच पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातील बचतगटांच्या ८०० महिलांना शासनामार्फत गाय वाटप केली आहे. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित केले.
यावेळी बोलताना पंकज मुंडे यांनी माझा प्रत्येक क्षण गरीब, वंचित आणि पिडित घटकांच्या कामाला यावा, यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे. माझ्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत, त्यामुळे कुणी कितीही आरोप करा, मी समाजाची सेवा करतच राहील. मला नांव कमविण्यापेक्षा सर्व सामान्य माणसाचा आशीर्वाद कमवायचा आहे असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘हे लुच्चे लफंगे लोक खोटं बोलतात , यांना आता गावातील महिलांचं धडा शिकवणार आहेत. आमच्या सारखे पुढारी हे आधी आले अन त्यांनी स्त्रियांचं वाटोळं केलं अशा शब्दात विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच महिलांना आम्ही घरपोच गाय दिली आहे, दिवाळीत भावाची जशी ओवाळणी असते तशी माझ्या शेकडो बहिणींची काळजी म्हणून मी ही भेट आणली आहे.असं विधान क्र्ल्र आहे.
तसेच मी ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी ५६ हजार बचतगट होते, आता याची संख्या चार लाखांवर गेली आहे. ही चळवळ गतीमान करून महिलांना सशक्त केले असल्याचे त्या म्हणाल्या. एकीकडे दुष्काळात शेतकरी आत्महत्या होत असतांना दुसरीकडे मात्र बचतगटांच्या महिलांनी आपल्या व्यवसायातून घराला सावरले, त्यांची हीच ताकद मला मोठी वाटते असं विधान पंकजा यांनी केले आहे.
- … तर भविष्यात लोकं माझ्यासोबत राहणार नाहीत : उदयनराजे
- कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, आता राष्ट्रवादी मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा : पंकजा मुंडे
- ‘माझी लढाई व्यक्ती विरूध्द नव्हे तर परळीच्या माणसांच्या भल्यासाठी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

