टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत.
याविषयी भाष्य करताना उदयनराजेंनी ‘मी आजपर्यंत ज्या ज्या योजना आणल्या, त्याकडे माजी मुख्यमंत्र्यांनी साधे पाहिले देखील नाही. कृष्णा खोरे योजनेतून या भागात वेळीच विकासाची कामे झाली असती, तर आज या भागात ही दुष्काळाची स्थिती निर्माण झाली नसती. या निष्क्रिय अशा रिकाम्या लोकांबरोबर राहिलो, तर भविष्यात लोकचं माझ्यासोबत राहणार नाहीत’ असं विधान केले आहे.
तसेच पुढे बोलताना उदयन राजे यांनी ‘माझी प्राधान्यता या भागाच्या विकासाला आहे. मग तो कुठला पक्ष करतो ते माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी या भागाच्या विकासासाठी मदत केलेली आहे. दुसरीकडे यापूर्वीचा अनुभव वेगळा होता. मी या भागाच्या विकासाच्या योजना घेऊन नेतृत्वाकडे जायचो, पण त्याकडे साधे पाहिलेही जात नव्हते असं विधान केले आहे.
दरम्यान, उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य करताना उदयनराजेंना ‘पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत असं विधान केले होते. पाटील यांच्या या विधानाला उदयनराजे यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी मला प्रवेश करायचा असला तर मी पुढाकार घेईन असं विधान केले होते. त्यामुळे उदयन राजे आता काय भूमिका घेणार हे पाहन महत्वाच ठरणार आहे.
- शेअर बाजार गडगडला; निर्देशांकात ७६९ अंकांची घसरण
- विराट कोहलीचा विक्रम; गांगुली, धोनीला टाकले मागे
- सगळी पद भोगली आता मुख्यमंत्री पदाचा विचार करेल : रावसाहेब दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

