Share

कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, आता राष्ट्रवादी मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा : पंकजा मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर रासपचा महा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनगर आरक्षणावरून विरोधकांना चांगलेचं टोले मारले.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, सत्तर वर्षे कॉंग्रेस – राष्ट्रवादीने धनगर आरक्षणाचे नुसते गाजर दाखवले. आरक्षणाच्या दृष्टीने काहीही केले नाही. केवळ आश्वासन दिली. मात्र या सरकारने ते करून दाखवले. याआधी आम्ही कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र ती खरी केली आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा, असे म्हणत कार्यक्रमातील उपस्थितांना पुन्हा एकदा एकत्रितपणे सामान्य माणसांची सत्ता आणू असे आवाहन केले.

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. विविध यात्रा काढून, सभा – मेळावे घेऊन मतदाराला आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अशी चुरस असतानाचं विरोधकांची एकी फुटली आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामूळे निवडणुकी आधीचं विरोधकांच राजकारणातील अस्तित्वचं धोक्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!