Share

‘शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भ दौऱ्यावर आले हेच कळत नाही’

Published On: 

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष चांगलेच कामाला लागलेले आहेत. ‘विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचं एकमेव दुकान बंद होईल’, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विदर्भाकडे लक्ष दिल्याचे दिसत आहे.

शरद पवार हे आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे. त्यांच्या या दौऱ्यावर आता भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांनी टीका केली आहे.

शरद पवार कोणत्या तोंडाने विदर्भाच्या दौऱ्यावर आलेत हेच कळत नाही. त्यांनी अमरावतीमध्ये येऊच नये. त्यांना संतप्त नागरिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विदर्भात फिरतानासुद्धा त्यांनी थोडी सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्याच्या वाढलेल्या आत्महत्या या काळात झाल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वीच काय अजूनही कोणतीच मदत मिळाली नाही. कापसाची बोंडआळी असो की, संत्र्याची फळगळ असो, सोयाबीनचे पैसे मिळाले नाहीत, विम्याचे पैसे मिळाले नाहीत, असं अनिल बोंडे सांगत होते.

अमरावतीमध्ये 12 तारखेला 40 हजार मुस्लिमांनी एकत्र येऊन जो नंगानाच केला लोकांना मारलं, दुकानं लुटली. त्याचीही कल्पना राज्याच्या गृहमंत्र्यांना आलेली नाही. अमरावतीमध्ये आज असंतोष आहे म्हणून शरद पवारांनी अमरावतीमध्ये तर पाऊलच ठेवू नये त्यांना या असंतोषाला सामोरं जावं लागेल, असंही अनिल बोंडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!