Share

‘आधी क्रांतीकारकांचा अपमान, आता महात्मा गांधीवर टीका, यासाठीच पद्मश्री मिळाला का?’

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यावरुन सर्व क्षेत्रातून तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी तिच्या वक्तव्यामुळे तिला मूर्ख म्हणत तिच्या वक्तव्याला आणि तिला महत्व देणं चुक असल्याचंही म्हंटल आणि दुर्लक्ष केलं. त्यावरुन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कंगनावर टीका केली आहे.

कंगनाने केलेल्या बेताल वक्तव्याला मूर्खपणा म्हणून दुर्लक्ष करु शकत नाही, कारण कंगना ज्या विषयांवर बोलली ते आपल्या राष्ट्रीय अस्मितेशी जोडलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी स्वातंत्र्याला भीक म्हणून सांगितलं. आधी कंगनाने स्वातंत्र्याला भीक म्हंटलं, क्रांतीकारकांचा अपमान केला आणि आता महात्मा गांधींवर टीका केली. यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला आहे का?, असा सवाल नितीन राऊतांनी यावेळी विचारला आहे.

दरम्यान, कंगना रणौतने 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य नसून ती भीक आहे. खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं आहे. त्याचबरोबर ‘हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते,आपले हिरो हुशारीने निवडा’, असंही कंगना म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!